बंजारा समाजातील ढावलो गीते
बंजारा समाजातील बहुसंख्य गीते स्त्रियांनी गायिलेली आहेत. त्यामुळे स्त्रीमनाच्या सामूहिक नेणिवेतील स्त्रीनिष्ठ अनुभवांचे पोत तपासून पाहण्याची संधी येथे घेतली आहे. जॅस मारितेनया मते, काव्याचा उगमच माणसाच्या समग्र व्यक्तिमत्त्वात आहे. तो म्हणतो, “It proceeds from the totality of the man, sense, imagination, intellect, love, desire, instinct, blood and spirit together” मानवाच्या आत्मकेंद्रात संवेदनशक्ती, कल्पनाशक्ती, बुद्धी, प्रेम, …